भूम (प्रतिनिधी)- येथील शासकीय विश्रामगृह येथे सरपंच परिषद , सर्व पक्षीय पदाधिकारी व 18 पगड जाती धर्मातील नागरिकांनी मस्साजोग येथील मयत संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून शिक्षा करावी याबाबत पत्रकार परिषदेचे  आयोजन केले होते.

सदरील पत्रकार परिषद मध्ये सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी देशमुख व सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना  प्रशासनाने तातडीने अटक करून शिक्षा करणे गरजेचे आहे.कारण संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निघून हत्या केली आहे. ही हत्या माणुसकीला काळीमा फासणारी असून. सदरील घटनेचे व्हिडिओ पाहिल्यास मन पिळून टाकणारी घटना असल्याचे समोर येत आहे. ही पत्रकार परिषद ही कोणत्याही जाती धर्माच्या किंवा एका जातीच्या किंवा  कोणत्याच एका समाजातील नागरिकांविषयी नसून दंडमशाही व समाजाला दडपणात ठेवणाऱ्या गुंडशाही विरुद्ध आहे. असे यावेळी उपस्थित सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सरपंच परिषदेचे सरपंच यांनी सांगितले. यामुळे 11 जानेवारी रोजी होणाऱ्या धाराशिव येथील आक्रोश मोर्चाला भूम- परांडा व वाशी या तिन्ही तालुक्यातील 18 पगड जाती धर्मातील  व सर्व पक्षांमधील नागरिकांनी मोठ्या ताकतीने सदरील घटनेला वाचा फोडण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन या पत्रकार परिषद दरम्यान उपस्थित नागरिक, सर्वपक्षीय अधिकारी व सरपंच यांनी केले. यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सरपंच परिषदेचे पदाधिकारी,सर्व समाजाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 
Top