धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने परवाह उपक्रमातंर्गत जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले.हे अभियान 1 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणा-या बैलगाडी व ट्रॅक्टरवाहनांना परावतिका लावण्यात आले. वाहन चालकांना अपघात होणार नाहीत याबाबतीत सतर्कता राखावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मद्यपान करून वाहन चालविणा-या वाहनांची तपासणी करण्यात येवून चालकांना गुलाब पुष्प देवून वाहतुकीच्या नियमाबाबत मार्गदर्शन केले.हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकी स्वारांवर मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये कारवाई करण्यात आली.
7 जानेवारी रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “ हेल्मेट बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी व कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक व सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयातील कर्मचारी वर्ग,शिपाई व कार्यालयात आलेले,सर्व वाहन चालक-मालक तसेच विविध कामासाठी आलेले सर्व नागरिक उपस्थित होते.
ही रॅली कार्यालयातून मार्गस्थ होऊन धाराशिव शहरातून मार्ग तेरणा कॉलेज,सेंट्रल बिल्डींग,माणिक चौक, बार्शी नाका,आर्य समाज चौक,गाडगे महाराज चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक,बस स्टॅन्ड जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा अधिक्षक कार्यालयमार्गे सेंट्रल बिल्डींग या मार्गानुसार शहरातील नागरिकांना रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने हेल्मेट बाईक रॅलीद्वारे प्रदर्शन करण्यात आले.रॅलीचा कार्यालयात समारोप करण्यात आला.
8 जानेवारी रोजी उमरगा चेक पोस्टवर नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी नेत्रचिकित्सा अधिकारी ए.पी.चव्हाण,समुपदेशक ए.जे.भालेराव,प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए.एन.चव्हाण,शिवरुद इसाके, एस.बी.शिंदे,मोटार वाहन निरीक्षक संदीप गोसावी,संतोष पाटील,सहायक मोटार वाहन निरीक्षक संजय नकाते,मोटार वाहन निरीक्षक पुनम पोळ व सहायक मोटार वाहन निरीक्षक सिधार्थ मस्के,वाहन चालक लोमटे,क्षिरसागर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.