भूम (प्रतिनिधी)- मुले मुली वारस असताना माता पित्यांना वृद्धाश्रमाचा आधार घेण्याची वेळ येत असेल तर मोठी शोकांतिका असल्याची खंत हभप ओंकार बाबर महाराज यांनी श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सवाच्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या किर्तन सेवे प्रसंगी व्यक्त केली. 

बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी हभप बाबर महाराज यांनी श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सवाच्या निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाची किर्तन सेवा झाली.  यावेळी हभप ओंकार बाबर महाराज यांनी किर्तन सेवेतून प्रबोधन करताना भाविक भक्तांना वेगवेगळी दृष्टांत देत मंत्रमुग्ध केले यावेळी त्यांनी कुटुंबात धार्मिकतेच्या विचाराचा सुगंध दरवळा असेल तर ते कुटूंब समाधानी असेल, मांसाहार बंद करा , व्यसन बंद करा ,  साधू संताच्या विचाराने मार्गक्रमण केल्यास समाधान मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

 
Top