तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील सुरेख स्मृती आठवडा बाजार येथे नुकतेच वाहनतळ निर्मिती केली असुन भक्तांच्या लावलेल्या गाड्या मधुन मोबाईल व ईतर किमती वस्तू चोरींचे प्रमाण वाढल्याने येथे प्रशाषणाने सुरक्षा रक्षक नेमुन सीसीटीव्ही बसवावी अशी मागणी होत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात नुकतीच गाजावाजा करीत शुक्रवार पेठ भागात सुरेख स्मृती आठवडा बाजार हाडको मैदान येथे वाहनतळ निर्मिती केली. ही जागा श्रीतुळजाभवानी मंदीर जवळ अवघ्या पाच मिनीट अंतरावर असल्याने भाविकांची पायपीठ वाचुन घाटशिळ वाहनतळ येथील वाहनांचा लोड कमी झाला. येथे लावलेले वाहने शहरात जात नसल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी झाला.
ऐवढे सगळे लाभ असताना या वाहन तळात वाहन सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना नसल्याने येथे लावलेल्या वाहनातुन मोबाईल व किमती वस्तु चो-या वाढल्या ऐकतर वाहन सुरक्षा नाही मग पार्कींग पावती फाडायाची कशासाठी असा सवाल ञस्त भाविकांन मधुन केला जात असल्याने येथे वाहन सुरक्षासाठी सीसीटीव्ही बसवावी व सुरक्षा कर्मचारी नेमणे यासह उपाययोजना करावी अन्यथा पार्किंग पावती फाडू नये अशी मागणी भाविक व वाहन चालाकांन मधुन केली जात आहे.
पावती तारखेत गोलमाल !
भाविक मंगळवारी पहाटे दर्शनार्थ वाहन घेऊन आला असताना त्यास दिनांक 28/1/2025 ची पावती देणे गरजेचे असताना वाहन चालकांना माञ चक्क 30/1/2025तारीख असलेली पावती दिली असल्याने चोरीचा गुन्हा कसा दाखल करायाचा असा प्रश्न भाविकांना पडत आहे.