भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे राष्ट्रीय मतदार दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन तसेच पुरस्कार वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.चंदनशिव अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसिलदार जयवंत पाटील, नायाब तहसिलदार मनोरमा गाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव विद्या विकास मंडळ पाथरुडचे संतोष शिंदे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. शिंदे हे लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसिलदार जयवंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी प्रा.जी.यु.तिजारे, प्रा. मसराम सर, डॉ. माळी यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आभार नोडल अधिकारी डॉ. ए. डी. दुनघव यांनी केले तर सुत्रसंचालन नोडल अधिकारी डॉ. राजश्री तावरे यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.