उमरगा (प्रतिनिधी)-  अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे ग्राम विकासाला हातभार लागतो असे प्रतिपादन डॉ. वसंत गायकवाड यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी विशेष शिबिर मौजे जकेकुरवाडी येथे सुरू होते. “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी“ ही थीम घेवून शिबीर करण्यात आले. 

या शिबिराचा समारोप जेकेकुरवाडी गावामध्ये करण्यात आला. सात दिवसाच्या विशेष शिबिरामध्ये वृक्ष संवर्धन, शोष खड्डे, ग्राम स्वच्छता, अंतर्गत गटारीची कामे बालविवाह निर्मूलन जनजागृती, शेतकऱ्यास मार्गदर्शन, ॲनेमिया तपासणी, ग्रामीण युवकासाठी उद्योजकीय संधी, विविध पूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम या शिबिरादरम्यान घेण्यात आली होते. समारोप समारंभ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक, किरण बंडे, वैभव सूर्यवंशी, आपले मनोगत व्यक्त करून सात दिवसातील अनुभव त्यांनी सर्वांसमोर मांडला. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सिद्धू झंपले, रोहन कांबळे, पाचंगे अर्जुन प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीमध्ये जेकेकुरवाडीच्या शालेय समितीचे उपाध्यक्ष गणेश पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक दुधनाळे सर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.तसेच महेश माने, सुनील औरादे आणि ग्रामपंचायत सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.  डॉ. गिरीधर सोमवंशी, डॉ. भरत शेळके, प्रा. सूर्यकांत राठोड, डॉ. वसंत गायकवाड, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. मुरली जाधव, डॉ. अनिल देशमुख, प्रा. विजय पवार प्रा. मनोज गायकवाड, प्रा. डी.डी. पांढरे, प्रा.सचिन चव्हान, प्रा.सुजित शिंदेआदींनी  शिबिराच्या यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.भरत शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सिद्धू  झंपले यांनी केले. तर आभार प्रज्वल चव्हाण यांनी मांडले.

 
Top