धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचा उत्कृष्ट नागरीक घडण्यासाठी व आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने दररोज किमान 2 तास खेळले पाहिजे. तसेच संघर्षातून निर्माण झालेले अस्तित्व हे नेहमीच खास असते. कारण त्यामागे मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांचा ठेवा असतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधीकारी सचिन इगे यांनी केले.

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव येथे आयोजित जिल्हास्तर सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेचे उदघाटन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव सचिन इगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भैरवनाथ नाईकवाडी तालुका क्रीडा अधिकारी, भरत जगताप अध्यक्ष जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, गुरुनाथ माळी राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू, योगेश थोरबोले सचिव जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, जिम्नॅस्टिक प्रशिक्षक डिंपल ठाकरे, प्रभाकर काळे, गणेश सापते यांची प्रमुख उपस्थित होती.

या स्पर्धेत जिल्ह्यातील 700 ते 730 मुले, मुलींनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेतून पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड होणार आहे. या स्पर्धेचे तांत्रिक काम माउली भुतेकर व राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित सुरवसे, ओमप्रकाश ढगे, योगिनी साळुंके, प्रणिता जाधवर,करण बिक्कड, विराज जाधवर काम बघत आहेत.

 
Top