धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची औषध निर्मिती संलग्नित आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम आयटी व फार्मसी कंपनीमध्ये झाली होती. तसेच यावर्षीही हेच यशाचे सूत्र कायम ठेवत विद्यार्थ्यांची फार्मसी विभागातील सर्वोत्तम आयटी कंपनीमध्ये परत एकदा निवड झालेली आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, औषध निर्माण क्षेत्रातील नामांकित जागतिक स्तरावरील कंपन्या रिलायन्स फार्मा, वखाडृ लिमिटेड,वखाडृ बायोटेक,श्रेया लाईफ सायन्सेस, इत्यादी तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस),गिब्स, विमटा लॅब्स, आय के एस हेल्थ यासारख्या आयटी नामांकित कंपन्यांमध्ये फार्मसी विभागातील 70% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. असे प्राचार्य माने यांनी सांगितले.
आयटी कंपनी टाटा कॉल सेंटर सर्विस व आय के एस हेल्थ या कंपनीमध्ये अनुक्रमे सुशृता शिंगाडे, प्रसन्ना घेडे,अंबिका आगळे,संताजी पाटील, अमोल तळणीकर व पद्माकर शिरुरे, प्रज्वल मोरे यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब वाघ,अशोक शिंदे आणि विजेंद्र चव्हाण, व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख डॉ. पी. टी.माने व सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी टीपीओ अशोक जगताप व विभागीय टीपीओ डॉ. गुरुप्रसाद चिवटे यांनी विशेष प्रयत्न केले.