धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील कलाविष्कार अकादमी धाराशिव द्वारा हौशी छंदी गायकांचा मेलडी स्टार्स समुहाच्या वतीने दशक पूर्तीकडे वाटचाल करित प्रतिवर्षी प्रमाणे ' साल नया गीत पुराने ' अविट गीतांची बेधुंद मैफिलीचे आयोजन शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सांय 6 ते 9 या वेळेत मेघमल्हार हॉल मध्ये संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी प्रतिवर्षी प्रमाणे शहरवासीयांनी या संगीत मैफिलीचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष युवराज नळे, समन्वयक रवींद्र कुलकर्णी सह समन्यवयक शरद वडगावकर, कलाध्यापक शेषनाथ वाघ आदि सदस्य यांनी केले.