तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील हंगरगा रस्त्यावर असणाऱ्या प्रतिक्षानगर मधील कृष्णा काँलनीतील वकील दाम्पत्यांच्या घरात शिरुन अज्ञात चोरट्यांनी घरातील सामान व कँश नेल्याची माहीती वकील दाम्पत्यांनी दिली. ही घटना मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या भागाबरोबरच दयानंद नगरमध्ये चोरीच्या घटना घडल्याचे कळते. यापुर्वी या वकिलाची दुचाकी चोरीला गेली होती. या वकिलांनी स्वताच सहा महिने शोध घेऊन ती शोधली.
या बाबतीत अधिक माहिती अशी कि, शहरातील हंगरगा रस्त्यावर असणाऱ्या प्रतिक्षानगर मधील कृष्णा कॉललनीत ॲड. स्वाती शिंदे व ॲड. अजय जोडगे हे राहतात. मंगळवार पहाटे घराचा पाठीमागील लाईट बंद करुन चोरटे मोठ्या बाबुने घराचा दरवाजा उघडला. आत घरात प्रवेश केला व पुर्ण घर चाळले. यात घरातील सामान व रोख रक्कम नेल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांना कळवले असता त्यांनी ही चोरी भुरटे चोऱ्यांनी केल्याचे सांगितले.
यांनी घरातील किचन जावुन फ्रिज उघडले. देवघरात जावुन आले, खालचे ड्राँवर, दिवाणचा दरवाजा खाली पडताच वकील कुंटुंब जागे होताच अज्ञात चोरटे पळुन गेल्याचे समजते. सदरील परिसर हा गावाचा बाह्य भागात आहे. या चोरीच्या घटनेने शहरात भितीचे व घबराहटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील दयानंद भागात या चोरट्यांनी कार्यक्रम केल्याचे समजते. तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत चैन स्नँकिंग, मोटारसायकल चो-यांच्या प्रमाणात वाढ होत असुन सोशल मिडीयावर मोठ्या संखेने चोरी घटने बाबतीत व्हीडीओ पोस्ट पडत आहेत. लोकप्रतिनिधीनी या चोरांच्या घटनात लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.