धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागरण रॅली व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे होते. तर तहसीलदार मृणाल जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, मतदार जनजागृती समिती जिल्हाध्यक्ष एम.डी. देशमुख, जिल्हा विज्ञान मंडळ पर्यवेक्षक टी. एफ. काझी, विस्ताराधिकारी भारत देवगुडे, उपप्राचार्य व्ही. के. देशमुख, पर्यवेक्षक ए. के. दीक्षित, सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे, उपाध्यक्ष संजय गजधने ,उपाध्यक्ष सचिन चौधरी, सहसचिव बाबासाहेब कोषाध्यक्ष, रौफ शेख, सल्लागार बलभीम कांबळे, सदस्य सलीम शेख,आयुब पठाण, राजेंद्र धावारे, सिद्राम वाघमारे आदी व्यासपीठावर उपास्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मतदार जनजागृती रॅलीने करण्यात आली. यावेळी मतदार जनजागृती बाबत तहसीलदार मृणाल जाधव, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, प्रा. राहुल पाटील, प्राचार्य बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. के. डी. पवार यांनी संविधनाचे व प्रतिज्ञा वाचन केले. श्रीमती यु एम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार ए. के. दिक्षित यांनी मानले.