धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय  रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले, भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामुदायिक वाचन तसेच तंबाखु विरोधी सेवन व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. रुग्ण कल्याण समितीच्या वतीने शासकीय रुग्णालयातील अधिकारी,कर्मचारी, परिसेविका यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ,तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती तथा इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र रौफ शेख,परिचर्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य भांगे,डॉ.सचिन देशमुख, सर्जन डॉ.नानासाहेब गोसावी,डॉ.कदम, डॉ.सुशिल चव्हाण,डॉ.महेश कानडे, डॉ.फुलारी सर,सिध्दार्थ जानराव,लहु कोळी,मदनुरकर,सह अन्य इतर उपस्थित होते तर परिचारिका सुवर्णा देशमुख,सुरेखा गवई, संगिता फड,रेखा लोंढे,राहिली मुल्ला,दिपाली कांबळे,सपना शेट्टी,मिना शेंडे,सुमित्रा जावरकर, शकुंतला सुरवसे,ब्रदर छत्रपाल वाघमारे,संदिप सरफाळे, यशवंत कदम,एकनाथ कलबोने,फैय्याज पठाण यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


 
Top