धाराशिव (प्रतिनिधी)-येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, उपप्राचार्य व्हि. के. देशमुख, पर्यवेक्षक ए.के. दिक्षित, माजी पर्यवेक्षक सी. एन. क्षीरसागर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ध्वजा रोहणानंतर एनसीसीचे एन. बी चव्हाण व स्काऊट गाईड बी. एल. मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे पथसंचलन घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व्ही. के. देशमुख यांनी केले. संविधान वाचन के.डी. पवार यांनी केले. विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्ती गिते व एकांकिका सादरीकरण करण्यात आले. सहशिक्षक एस. डी. नागलबोने, जे. पी. गिते, ए. व्ही. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन आर. आर. लोकरे यांनी केले. आभार एस. जी. भोसले यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.