धाराशिव (प्रतिनिधी)- महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत संप चालू असून लेखणी बंद काम बंद आंदोलन स्थगित करून महसूलचे काम सुरळीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दि.02 जानेवारी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. व त्याची एक प्रत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास देण्यात आली.
या निवेदनामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत संपत चालू असून महसूलची सर्व कामे बंद असल्याने शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अंतर्गत भांडणामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. दररोज वर्तमानपत्र व इतर सोशल मीडियामध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या बद्दल विविध प्रकारच्या बातम्या पाहायला व ऐकायला मिळत आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात जिल्हा प्रशासनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असून चुकीचा संदेश जात आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात जिल्ह्याचे प्रमुख म्हणून सर्व कारभार सुरळीत होण्यासाठी लक्ष घालून महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा बेमुदत संप थांबवून, महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे काम सुरळीत चालू होण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी. तसेच जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.