धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय रोलबॉल महासंघाचे अधिपत्याखाली महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने सातारा येथे घेण्यात आलेल्या 11 वर्षाखालील राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे याने सुवर्णपदक पटकाविले आहे.
सातारा येथे झालेले राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेतून महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार यांनी 11 वर्षे वयोगटातील मुला- मुलींचे संघ जाहीर केले होते. मुलांच्या संघात धाराशिव जिल्हा रोल बॉल संघटनेचा खेळाडू प्रणव मलदोडे याची तर धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेचे मुख्य प्रशिक्षक तथा सहसचिव प्रतापसिंह राठोड यांची संघ व्यवस्थापक पदी निवड करण्यात आली होती.
धाराशिव जिल्हा रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष धनंजय पाटील, सचिव गिरीश पाळणे, कोषाध्यक्ष सचिन देवगिरी, रोलबॉल कोच साई राठोड, ओम राठोड आदिसह संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, पालक आणि क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.