तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे कै.अमरसिंह पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. ज्योती कानाडे यांनी रूग्नांची डोळे तपासणी केली.
यावेळी 600 रूग्नांची तपासणी करण्यात आली.व मोफत औषधे वाटत करून नेत्र रूग्नांना आवश्यकतेनुसार चष्मे वाटप करण्यात आली. नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिग्विजय पाटील यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज झाडे, मतिन मोमीन, बिभीषण लोमटे, पोपट पांगरकर, विरभद्र शिराळ, हनुमंत कोळपे, राजेश लाड, पद्माकर माळी, मंगेश पांगरकर,केशव रामदासी यांनी परीश्रम घेतले.