धाराशिव (प्रतिनिधी)-  रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधिक्षक संजय जाधव व उपप्रादेशीक परीवहन अधिकारी हर्षल डाके आदी उपस्थित होते. रस्त्यावरील अपघात संख्या कमी व्हावेत यासाठी उपाययोजना करा असे प्रतिपादनखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

यावेळी जिल्हयातील वाहतुक  व्यवस्थेचा आढावा घेताना सदर बैठक प्रत्येक तीन महिन्यासह आयोजीत करण्यासह अनेक महत्वपुर्ण सुचना देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची दैन्य आवस्था पाहता 15 वर्षाच्या पुढील एस.टी.बस बंद करणेबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच अपघात ठिकाणी रुग्णवाहीका वेळेत पोहच करणेबाबतही संबंधीतांना सुचना दिल्या. याचबरोबर शहरातील वाहतुक व्यवस्थेचा उडालेला बोजा सुरळीत करण्याकरीता शहरातील वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासह नळदुर्ग रोडला जोडणारा तुळजापुर बायपास रस्त्याचे काम दि. 31 मार्च 2025 पुर्वी सुरु करण्यात यावा. काक्रंबा उड्डान पुलाचे अपुर्ण काम पुर्ण करणेकरीता दि. 01 जुन 2025 ही मुदत देण्यात आली. तामलवाडी येथे नविन अंडरग्राऊंन्ड पुल मंजुर करण्यात यावा. येणेगुर उड्डानपुल 15 दिवसात पुर्ण करावा. दि. 30 जुन 2025 पर्यंत अणदुर येथील उड्डान पुलाचे काम पुर्ण करावे. यासह महत्वपुर्ण सुचना व जिल्हयातील होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करणेकरीता महत्वपुर्ण सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीस प्रकल्प संचालक सोलापूर जावादे, प्रकल्प संचालक नांदेड स्वप्नीत कासार, कार्यकारी अभियंता. (सां.बा) चव्हाण, मुख्याधिकारी न.प. धाराशिव वसुधरा फड यांच्यासह उपप्रादेशीक परीवहन विभागाच्या कर्मचारी उपस्थीत होते.  

 
Top