तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्री गाथा पारायण व श्रीमद्‌‍ भागवत कथा उत्साहाने संपन्न झाली.               

अखंड हरिनाम सप्ताहात हभप. प्रकाश महाराज साठे यांनी श्रीमद्‌‍ भागवत कथेचे अर्थ निरूपण  केले. अखंड हरिनाम सप्ताहात हभप अनिल महाराज तुपे, हभप सुसेन महाराज नाईकवाडे, हभप समाधान महाराज भोजेकर, हभप लक्ष्मण महाराज देवकर, हभप कविराज महाराज झावरे, हभप महादेव महाराज राऊत, हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांची कीर्तने झाली. तर 27 जानेवारीला काल्याचे किर्तन हभप प्रकाश महाराज साठे यांचे झाले. 26 जानेवारीला दुपारी ग्रंथदिंडी मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. काल्याच्या किर्तनाला भावीकभक्त यांनी प्रचंड गर्दी केली होती.


 
Top