भूम (प्रतिनिधी)- भारत सरकारचे नोटरी म्हणून भूम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय शाळू यांची निवड झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
बुधवार दि. 8 जानेवारी 2024 रोजी ॲड संजय शाळू यांना नोटरी म्हणून निवड झालेचे आदेश पत्र प्राप्त झाले यानंतर केलेल्या सत्कार प्रसंगी भाजपचे भूम - परंडा - वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अमोल लोंढे, सिद्धार्थ जाधव, संतोष औताडे साहिल गरड, मुकूंद वाघमारे, बापू नागरगोजे, सुजित वेदपाठक यांची उपस्थिती होती.