तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ धाराशिव यांच्या कार्यालयातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी 22/1/24 रोजी धाराशिव येथील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केला होते. एक वर्ष उलटून अद्यापही अर्जदारांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. तसेच नोंदणीकृत महिला कामगारांचे भांडे समोर ठेवुन फोटो काढले व सह्या घेतल्या पण भांडे दिले गेले नाही. तरी या प्रकरणी चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी. अन्यथा नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था तुळजापूर यांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, तुळजापूर येथील तहसील कार्यालय तहसीलदार यांना घरेलू कामगार संदर्भात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ धाराशिव यांच्या कार्यालयातून देण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी 22/1/24 रोजी धाराशिव येथील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केला होते. एक वर्ष उलटून अद्यापही अर्जदारांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. एवढेच नाही तर नोंदणी झालेल्या धाराशिव येथील महाराष्ट्र कामगार मंडळ कार्यालयातून फोन करून त्यांना भांडे मिळणार असल्याचे सांगत कार्यालयामध्ये बोलावून भांडे ठेवलेल्या जागेजवळ उभा करून त्यांचे फोटो काढून घेतले आणि त्यांच्या सह्या घेतल्या. पाच सहा महिने उलटून गेले तरीही कोणत्याच लाभार्थ्याला साहित्य अथवा योजनेचा कोणताच लाभ मिळालेले नाही. तरी या संदर्भात तुळजापूर येथील महिला अर्जदार लाभार्थ्यांनी याबाबत तुळजापूर येथील तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली व झालेली हकीकत निवेदनाद्वारे त्यांना सांगितले. याबाबत लवकरात लवकर त्या कार्यालयातील अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. यामध्ये लाभार्थ्यांना मिळालेल्या वस्तू कोणापर्यंत गेल्या याची चौकशी करण्यात यावी. अन्यथा न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ता मीनाताई सोमाजी, संध्या खुरुद, रूपाली घाडगे, लता सोमाजी, लता हरवलकर, सुनिता काळे, सविता कानडे, जयश्री भालेकर, माधुरी पाटील, कविता पवार, सविता लबडे, सुनिता मसारे, शांता सुरवसे, अनिता शिंदे, कमल दांडे, स्मिता जमदाडे इत्यादी महिला उपस्थीत होत्या.