भूम - परंडा तालुक्यात बिबट्याचे पुन्हा आगमन झाले असून परंडा तालुक्यातील कांदलगाव शिवारात बिबट्याने म्हैशीच्या शिकार केली. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. कांदलगाव येथील शेतकरी युसुफ मेहबूब शेख या पशुपालक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले आहेत.
वन विभागाला या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी दिली असता अधिकाऱ्यांनी पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात परंडा तालुक्यातील अनेक जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. मात्र बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, पशुपालक पुन्हा भयभीत झाले आहेत.