धाराशिव (प्रतिनिधी)-येथील कवयित्री शिवनंदा माळी यांच्या “सय“ या कवितासंग्रहास नुकताच शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दिनांक 5 जानेवारी रोजी आयोजित मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघ यांच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट कवितासंग्रह म्हणून  शिवनंदा माळी लिखित 'सय' या कविता संग्रहास साहित्यरत्न हा पुरस्कारा देऊन गौरवण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. मा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार समाधान अवताडे, शिवाजीराव काळुंगे, डॉ. शिवाजी शिंदे सह कुलसचिव अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्षरवेल महिला साहित्य मंडळ धाराशिवच्या अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख, कमलताई नलावडे, रेखा ढगे, शर्मिष्ठा डांगे यांनी अभिनंदन केले. शिवनंदा माळी यांचे या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top