तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या  मंगरुळ येथील डॉ. रमेश लबडे यास पोलिस पथकाने शनिवार दि. 11 जानेवारी रोजी रात्री पुण्यात जेरबंद केले. रविवार त्यास न्यायालया समोर उभे केले असता न्यायमुर्तीने त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनवली.

तालुक्यातील मंगरुळ येथील ओम साई क्लिनिक येथील डॉ. रमेश राजेंद्र लबडे यांच्याविरोधात उपचारास दवाखान्यात आलेल्या युवतीवर अत्याचार केल्याची फिर्याद 1 नोव्हेंबर 2024 रोजी दिली होती. तेव्हा पासुन सदरील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे तपासाबाबतीत साशंकता व्यक्त केली जात आहे. या घटनेने पालक व मुलीमध्ये असुरक्षेचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे तुळजापूर तालुक्यातील शाळा, कॉलेज मधील विद्यार्थीनी व महिला सुरक्षेबाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांना डॉ. रमेशचा चुलत भाऊ संपर्कात असल्याची माहीती मिळाली. त्याचा शोध घेतला असता गायब असल्याचे निदर्शनास येताच त्याचे लोकेशन ट्रँप केले. ते पुण्यात दिसुन आले. तात्काळ तुळजापूर पोलिस स्टेशनच्या पथकाने पोलिस उपनिरीक्षक तात्याराव भालेराव, राऊत, गणेश माळी यांनी शनिवार दि. 11 जानेवारी रोजी  पुण्यात जावुन त्यास जेरबंद करून राञी तुळजापूर ला आणले. रविवार दि.12 जानेवारी रोजी तुळजापूर न्यायालया समोर उभे केले असता न्यायमुर्तीने त्यास दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

सदरील डॉक्टर ऐवढा मोठा गुन्हेगार असल्या सारखा सत्तर दिवस पोलिसांच्या हाती लागला नाही त्याने जामिनसाठी प्रयत्न केल्याचे समजते. सदरील डाँक्टर  पोलिसांना सापडत  नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर जनता प्रश्न चिन्ह उपस्थित करीत होती. अखेर त्यास जेरबंद केल्याने महिला वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे. डाँक्टर म्हणवणा-या या डाँक्टरच्या पदवी बाबतीत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. 

 
Top