धाराशिव (प्रतिनिधी)- आपली काळजी घेण्यासाठी भगवंतांनी आई पाठवली परंतु या जिजाऊंच्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आश्रमं निघालेली आहेत. हाडामासांची जिवंत मायबाप कळत नाहीत त्यांना संत काय कळणार? यांनी दोन खोल्यांमध्ये लेकरा बाळासह आपला संसार केला, पण आज दोन मजली इमारती असूनही आई-वडिलांना ठेवू शकत नाहीत ही खंत व्यक्त करून आई वडील असतानाच काळजी घ्या. नंतर खर्च करत बसू नका. त्यांनी आपल्यासाठी ओल्या अंतकरणाने भरभरून केले. तुम्ही कोरड्या अंतकरणांतरी करा. असा मौलिक हेतूपदेश सकल संत सेवा समिती धाराशिवमार्फत चालू असलेल्या संत तुकाराम महाराज चरित्र कथेत बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात केला.

प्रत्येक कथेतून संस्कारित मुले होण्यासाठी महाराज आई-वडिलांविषयी आवर्जून उपदेश करतात आणि ही काळाची गरज आहे. व कथेच्या प्रारंभि संत गोरोबाकाका ,भगवान कालेश्वर, प्रभू श्री रामचंद्र, श्री हनुमानजी,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, व येथील सर्व देवतांना वंदन करून कथेला सुरुवात करत असतात. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या घरातला दुःखद प्रसंग ,व त्यात दुष्काळ याचे वर्णन करताना महाराजांचाही कंठ दाटून आलेला होता. व सर्व भाविक वर्ग त्या प्रसंगात भयान शांत झालेला होता. व भावना हेलावणारे संगीताची ध्वनी चालू होती. अशा प्रकारे या कथेतून महाराजांनी पटेल, रुजेल, समजेल असे कोमल आणि पवित्र शब्दधन वाटून टाकले. पसायदानाने कथेची सांगता होऊन, शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.


 
Top