धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव  जिल्हा पत्रकार संघाची धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, लोहारा व उमरगा तालुका पत्रकार संघाची जम्बो कार्यकारणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी जाहीर केली आहे. यामध्ये परंडा तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आनंद खर्डेकर, उपाध्यक्ष निसार मुजावर, अविनाश ईटकर तर सचिवपदी प्रशांत मिश्रा यांची निवड करण्यात आली. तुळजापूर तालुकाध्यक्षपदी प्रदिप अमृतराव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सचिवपदी शुभम कदम तर तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे यांची निवड झाली. भूम तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद आडागळे, उपाध्यक्ष म्हणून विश्वनाथ फल्ले तर सचिवपदी बाबु खामकर, लोहारा तालुकाध्यक्षपदी बालाजी बिराजदार, उपाध्यक्ष सदाशिव जाधव, कार्याध्यक्ष महेबूब फकीर, सरचिटणीस सुधीर कोरे, कोषाध्यक्ष जसवंतसिंह बायस, उमरगा तालुकाध्यक्षपदी अविनाश काळे, उपाध्यक्ष शंकर बिराजदार, अमोल पाटील, सचिवपदी समीर सुतके, वाशी तालुकाध्यक्षपदी शहाजी चेडे, उपाध्यक्ष एम. आय. मुजावर तर सचिवपदी शिवाजी गवारे यांची निवड करण्यात आली आहे. या नुतन कार्यकारणीच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

परंडा तालुकाध्यक्षपदी खर्डेकर, उपाध्यक्ष म्हणून निसार मुजावर, अविनाश ईटकर तर सचिव पदी प्रशांत मिश्रा, सहसचिव भजनदास गुडे, कार्याध्यक्ष आशुतोष बनसोडे, कोषाध्यक्ष सचिन कुलकर्णी, सहकोषाध्यक्ष शहाजी कोकाटे सल्लागार म्हणून तु. दा. गंगावणे यांची सवार्नुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारणी सदस्यपदी सुहास मस्के, सचिन कारकर, अशोक माने, महेश शिंदे, सुरेश बागडे, सदाशिव डाके यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी धाराशिव जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य म्हणून विजय माने, गणेश राशनकर, किरण डाके यांचा समावेश करण्यात आला आहे.

तुळजापूर तालुकाध्यक्षपदी प्रदिप अमृतराव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सचिवपदी शुभम कदम तर तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीमध्ये सहसचिवपदी गणेश गायकवाड, तालुका कोषाध्यक्ष सोमनाथ शेटे, तुळजापूर शहर उपाध्यक्ष म्हणून सुरज बागल, शहर सचिव अमीर शेख तर सदस्य म्हणून सिद्दीक पटेल, प्रमोद कावरे, सचिन ठेले, गुरुनाथ बडुरे, अजित चंदनशिवे, सतिश पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संजय खुरुद तर सदस्य म्हणून जगदीश कुलकर्णी, सतीश महामुनी, गोविंद खुरुद, अनिल आगलावे यांची निवड करण्यात आली आहे.

भूम तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद आडागळे, उपाध्यक्ष फल्ले, सचिवपदी बाबु यादव खामकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीमध्ये सदस्य म्हणून गौस शेख, तानाजी सुपेकर, सुनिलकुमार डूंगरवाल, आशिष बाबर, अरविंद शिंदे, संजय घाटे, नंदकुमार देशमुख, आबासाहेब बोराडे, धनंजय शेटे, मुकूंद लगाडे नवनाथ यादव, पाडूंगर देवळकर, श्रीकृष्ण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

लोहारा तालुकाध्यक्षपदी बिराजदार, उपाध्यक्ष सदाशिव आणेबा जाधव, कार्याध्यक्ष महेबूब ईस्माई फकीर, सरचिटणीस सुधीर विश्वनाथ कोरे, कोषाध्यक्ष जसवंतसिंह करणसिंह बायस यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीत सहकोषाध्यक्ष बसवराज अण्णाप्पा होनाजे, प्रसिद्धी प्रमुख गणेश वसंत खबोले तर सदस्य म्हणून नीलकंठ शाहुराज कांबळे, तानाजी ज्ञानेश्वर माटे, गिरीश प्रकाश भगत, कालिदास विश्वनाथ गोरे, जगदिश सुरवसे, अब्बास रशिद शेख, यशवंत दत्तू भुसारे, सुनिल प्रकाश ठेले यांची निवड करण्यात आली आहे.

उमरगा तालुकाध्यक्षपदी काळे, उपाध्यक्षपदी शंकर रघुनाथराव बिराजदार, अमोल शामराव पाटील, सचिवपदी समीर चंद्रपाल सुतके यांची निवड करण्यात आली. यावेळी उर्वरित कार्यकारणीत सहसचिवपदी प्रदिप गुलाबराव भोसले, कोषाध्यक्ष नारायण चिमनगिरी गोस्वामी, तालुका संघटक गोळाप्पा लक्ष्मण कांबळे, ज्येष्ठ सल्लागार म्हणून देविसिंग राजपूत, बालाजी पांडुरंग वडजे, अंबादास बाबुराव जाधव, विलास वाडीकर, सुभाष गुंडाप्पा जेवळे, सचिन प्रकाशराव बिद्री, मारूती वैजिनाथ कदम तर सदस्य म्हणून युसूफ शब्बीर मुल्ला, विश्वास मोहन सोनकांबळे, परमेश्वर बाबुराव सुर्यवंशी, इब्राहिम शमशोदिन इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.

वाशी तालुकाध्यक्षपदी चेडे, उपाध्यक्ष एम. आय. मुजावर तर सचिवपदी शिवाजी गवारे यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी बळीराम जगताप, दिपक उंदरे, अजय वीर, सचिन कोरडे, विजयकुमार तुलशी, सौरभ सुकाळे, नितीन तळेकर यांची निवड करण्यात आली आहे.

 
Top