धाराशिव (प्रतिनिधी)-राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑपरेटीव्ह केडीट सोसायटी लि. परळी वैजीनाथ शाखा उमरगा येथे ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत,त्यांचे ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीच्या रक्कमा परत मिळालेल्या नाहीत.तसेच ज्यांचे बचत खात्यावरील / पिग्मी खात्यावरील रक्कम परत मिळालेल्या नाहीत अशा ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या ठेवीचे प्रमाणपत्र,पास बुक व आधारकाई यांचे छायांकित प्रतीसह आर्थिक गुन्हे शाखा,पोलीस अधीक्षक कार्यालय,धाराशिव येथे संपर्क साधावा,असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी केले आहे.