परंडा (प्रतिनिधी)- शहरातील बावची चौक येथे सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम दर्जदार होत नसल्यामुळे सदर रस्ता कामाची चौकशी करून ठेकेदार एस बी देशमुख यांचे नाव काळया यादीत टाकण्यात यावे अशी मागणी तुकाराम गंगावणे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीललदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारदवाडी ते काशीमबाग पर्यंत रस्ता कामाला मंजूरी देण्यात आली असुन यात परंडा शहराच्या हद्दीत सिनाकोळगाव कॉलनी ते सोनारी चौक पर्यंत सिमेंट रस्ता काम करावयाचे आहे. ठेकेदार यांनी मागील काही दिवसापूर्वी बावची चौक येथे सिमेंट रस्त्यांचे काम सुरू केले आहे.सदर काम संथ गतीने सुरू आहे. तसेच ते काम अंदाज पत्रकानुसार करण्यात येत नसून निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे. काही ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रस्ता खोदून तसाच ठेवलेला आहे. तसेच वेळोवेळी काम बंद पडत असल्यामुळे अर्धवट रस्त्या मुळे वाहतूकीस आडथळा निर्माण होऊन प्रवाशां सह शहरातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठेकेदार यानी केलेल्या अर्धवट व निकृष्ठ दर्जाच्या सिमेट रस्ता कामाची चौकशी करावी. तसेच ठेकेदार यांना बील अदा करू नये. अशी मागणी तुकाराम गंगावणे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top