वाशी (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस स्टेशन हद्दीमधील पूर्व दिशेच्या बाजूला  सकाळी 11 वाजून 10  मिनिटांनी स्पोट होऊन मोठा आवाज झाल्याने परिसरातील अनेक नागरिकाचे नुकसान झाले आहे . या स्पोटामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वाशी पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्या दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनच्या पूर्व बाजूस जेशीबी च्या साह्याने साफसफाई करण्यात आली होती. त्या जागेवरच दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास एकदम स्पोट आवाज झाला आहे .त्या स्फोटामुळे एक हजार मीटरच्याअंतरा वरील किरण जगदाळे यांच्या मोबाईल शॉपिंग दुकानाचे साहीत्य , सुरज विश्वेकर यांच्या ग्राहक सेवा केंद्रातील काचेचे टेबल व इतर साहिचे नुकसान झाले आहे . हिराचंद भानुदास सुकाळे यांच्या  घरचे दरवाजे , पञ्याचेशेड , एलडी टिव्ही व घरातील संसारउपयोगी साह्याचे  तसेच आन्य धाण्याचे नासधुस झाले आहे .तसेच पोलीस स्टेशन मधील जमादार   यांच्या बैठक रुमचे काचा फुटून खाली पडल्या आहेत . त्या मुळे पोलीस स्टेशनच्या खोल्याचे , व त्या परिससातील नागरीकाचे  नुकसान झाले आहे. या स्पोटाचे कारण समुजू शकले नाही म्हणून  श्वानपथक व बॉम्ब शोधपथक पाचारण करण्यात आले आहे. हे पथक शोध घेत आहे. भूमचे डी वाय एस .पी - हिरमुठ साहेब व धाराशिवअप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन  यांनी भेट देऊन चौकशी केलेले आहे.

 
Top