तुळजापूर (प्रतिनिधी)- देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून खेळांना अधिक प्रोत्साहन मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड आणि क्रीडासंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने 'खेलो इंडिया' सारखी स्पर्धा आयोजन करण्यात येत असल्याने मत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मॅट कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आरळी बुद्रुक येथे पस्तीस लाख रुपयांचा साठ बाय शंभर फूट आकाराचा सुसज्ज मॅट कुस्ती आखाडा हॉल उभारला जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या भागातून दर्जेदार खेळाडू घडावेत यासाठी संजय रमेश पारवे यांनी आपली स्वतःची साडे सहा एकर जमीन दिल्याबद्दल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कौतुक करून आभार मानले.
याप्रसंगी भाजपाचे नितीन काळे, राजसिंहराजे निंबाळकर,उप महाराष्ट्र केसरी मारुती वडार, महाराष्ट्र चॅम्पियन अजित भोसले,स्वराज पक्ष जिल्हाध्यक्ष महेश गवळी, दयानंद वाकुळे,संतोष बोबडे,विजय शिंगाडे,आनंद कंदले,शाहूराज मगर, अरविंद घोडके, प्रतीक रोचकरी,चित्तरंजन सरडे, प्रतापसिंह सरडे, माजी सरपंच गोविंद पारवे, सुनील पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माऊली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साडेसहा एकर जमिनीचे मैदान तयार केले आहे. कुस्ती आखाडा तयार झाला आहे. 30 पैलवान निवाशी प्रशिक्षण घेत आहेत. व्हॉलीबॉलचे मैदान तयार झाले आहे. क्रिकेटचे मैदानही आहे. धावण्यासाठी ट्रकही तयार केला आहे.खो खो मैदान,कबड्डी मैदान, स्विमिंग टँकसह असे उर्वरित मैदानेही जूनपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्या अंतर्गत आता काम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त क्रिकेटचे सामने भरविले जातात.
संजय रमेश पारवे - अध्यक्ष