तुळजापूर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलाने झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव लिंबराज कोरेकर हे होते. व्यासपीठावर अभिनेता व कथाकथनकार अरुण गिरी, प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड,उपप्राचार्य नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य रमेश नन्नवरे, सांस्कृतिक विभागप्रमुख विनय चौधरी, माजी सिनेट सदस्य संभाजी भोसले यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

प्रारंभी तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ.नरसिंग जाधव, प्रा रमेश ननवरे, प्रा संभाजी भोसले, डॉ विनय चौधरी, डॉ.अनिल शित्रे, डॉ.मंदार गायकवाड, डॉ.अशोक कदम, डॉ आशा बिडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्ताने विद्यापीठ स्तरावर संपन्न झालेल्या युवक महोत्सवामध्ये लावणी व कोलाज मधील प्राजक्ता दयानंद रेनके, वक्तृत्व व काव्यवाचन मधून अस्मिता विजय शिंदे, शास्त्रीय व सुगम गायन मधून वैष्णवी भीमराव बनकर यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याशिवाय सॉफ्टबॉल टेनिस मधून राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवणारी प्रियांका किरण हंगरगेकर व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक विजेता कृष्णा संताजी थिटे कुस्तीपटू राहुल राजकुमार काळे, विशाल तानाजी गावडे, शंकर नामदेव गावडे, सतीश नामदेव गावडे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कथाकथनकार व अभिनेते अरुण गिरी यांनी शहरी आणि ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारे “ ममई “ ही कथा सांगितली विद्यार्थ्यांना शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांच्यातील फरक सांगताना ग्रामीण जीवनच आपल्यासाठी योग्य आहे असा संदेश दिला. बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी याप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेऊ शकलो नाही परंतु राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला त्यामधून यश प्राप्त झाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या सत्तेच्या विकेंद्रीकरणांमधून ग्रामीण भागातील युवकांना राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली असे या निमित्ताने सांगितले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ विनय चौधरी, डॉ .शिवाजी जेटीथोर, प्रदीप कदम, प्रकाश कुंभार, राजू बनसोडे यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ शिवाजी जेटीथोर व आभार प्रदर्शन उपप्राचार्य नरसिंग जाधव यांनी मानले.

 
Top