कळंब (प्रतिनिधी)- रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न व रोगमुक्त कुटुंब निर्माण करा. काळी आई वाचवा, अभियानाचा जागर करत हे अभियान घेऊन जालंदर पंजाब येथील ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट या कंपनीचे नॅशनल मार्केटिंग हेड सुखविंदर सिंग व हनी सिंग यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. यानंतर कळंब येथे शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कमी खर्चामध्ये उत्पादन चांगले काढण्यासाठी सेंद्रिय शेती केलेले फायदेशीर ठरेल असे सखोल मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की रासायनिक खताचा अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे व मानवी जीवन धोक्यात आले आहे. कॅन्सर सारख्या महाभयानक आजारापासून येणाऱ्या पिढ्या वाचवण्यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गुरुकृपा हर्बल एजन्सी जी प्लॅनेट कळंब येथे या मेळावाचे आयोजन दि. 13 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी पत्रकार सतीश टोणगे, विलास मुळीक, रमेश अंबिरकर, शंकर भोरे, प्रगतशील शेतकरी गणेश फाटक, अजय माळी, गणेश बिडवे, ज्ञानोबा कोल्हे, बालाजी शितोळे, नानासाहेब पाडे, बालाजी घाडगे, हैदर अली शेख, सतीश तवले, अशोक गायकवाड यांच्या उपस्थितीत या मान्यवरांचा व प्रगतशील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीची माहिती पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ जाहीर यांनी केले. आभार प्रदर्शन गुरुकृपा हर्बल एजन्सीचे संचालक ईश्वर भोसले यांनी आभार मानले.