कळंब (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे धाराशिव जिल्हा अधिवेशन  व डॉ.अशोकराव मोहेकर यांना जीवन गौरव तसेच डी.के. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ अनंतराव सूर्यवंशी यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व जिल्ह्यातील 16  शिक्षक व मुख्याध्यापक यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ विचारवंत एम.डी देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील होते.

यावेळी ज्येष्ठ डॉ. बी. आर. पाटील,  डॉ.अशोकराव मोहेकर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, महादेव महाराज अडसूळ, प्राचार्य डॉ. सुनील पवार, सुरेश टेकाळे, डॉ. गिरीष कुलकर्णी, के. व्ही. गाजरे, विकास देशमुख आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी जीवन गौरव पुरस्काराने ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, कथामालेचे जिल्हाध्यक्ष डि.के. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आदर्श मुख्याध्यापक म्हणून अनंतराव सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एक मुख्याध्यापक व एक माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला. आमदार कैलास पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, आज समोर बसलेली शिक्षकाची शेवटची पिढी असून आता नवीन शिक्षण पद्धती येत आहेत आपण विकसित देश म्हणून सांगत आहोत परंतु ज्या देशात शिक्षण व आरोग्य हे मोफत मिळते तो खरा विकसित देश असतो. या प्रसंगी डॉ. अशोक मोहेकर, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रय लांडगे, शिक्षण तज्ञ एम.डी.देशमुख, अनंतराव सूर्यवंशी, डॉ. बी .आर पाटील, महादेव महाराज अडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी 8 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी नागरिक, पत्रकार  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी केले व प्रमुख पाहुणे यांचे स्वागत धाराशिव जिल्हा कथामालेचे पदाधिकारी प्रदीप यादव  सूत्रसंचालन काकासाहेब मुंडे, प्राचार्य महादेव गपाट यांनी, व आभार  कथामालेचे तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी केले.

 
Top