कळंब (प्रतिनिधी)- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, दक्षिण पीठ, नाणीज धाम, यांचा 28 जानेवारी रोजी, रामदेव बाबा मंदिर ट्रस्ट, संजय किशनराव भोसले यांच्या शेतात आनंद नगर येथे, आंबेजोगाई शहरांमध्ये भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या स्व-स्वरूप संप्रदायाच्या वतीने देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी कार्य केले जाते यात संस्थांनच्या वतीने विनामूल्य 54 ॲम्बुलन्स राष्ट्रीय महामार्गावर चालतात, गोरगरीब व गरजू मुलांना इंग्रजी माध्यमाचे ते बारावीपर्यंत शिक्षण मोफत दिलं जातं, हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्या लोकांना हिंदू धर्मात परत आणून त्यांचा रोटी बेटीचा व्यवहार संप्रदायामार्फत चालू करून दिला आहे, लाखो लोकांची व्यसन मुक्ती आजपर्यंत महाराजांनी केली आहे, आताच 4 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये सांप्रदायाच्या माध्यमातून 1 लाख 36 हजार 270 रक्त कुपेकेच सांप्रदायाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आलं हा विश्व विक्रमच आहे, 7 अवयव दान या संप्रदायाच्या माध्यमातून झालेले आहेत, त्याचबरोबर 78 देहदान मेडिकल कॉलेजला आजपर्यंत सांप्रदायामार्फत सुफुर्द करण्यात आलेले आहेत, मागे महाड, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी येथे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला सांप्रदायामार्फत मदतीचा हात देण्यात आला त्यामध्ये धान्यवाटप असेल साफ सफाईचे कामे असतील हे सर्व सांप्रदायमार्फत केले गेले, असे अनेक विविध उपक्रम सांप्रदायामार्फत राबविण्यात येत आहेत दरवर्षी पादुका दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल, शाळेला प्रयोग शाळेचे साहित्य वाटप असेल, शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्यांचे, कृषी साहित्याचे, बियाणाचे वाटप असेल, असे अनेक उपक्रम सांप्रदायमार्फत समाज उपयोगी चालवले जातात.
या कार्यक्रमा दिवशी 28 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता शिवाजी चौक आंबेजोगाई येथून भव्य शोभा यात्रेला प्रारंभ होणार आहे दहा वाजेपर्यंत शोभायात्रा कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत यात पादुका व गुरुपूजन सोहळा जगद्गुरुंचे पादुका पूजन, सामाजिक उपक्रमा अंतर्गत 54 शिलाई मशीनचे गोरगरिबांना वाटप, प्रवचन, आरती सोहळा, उपासक दीक्षा, दर्शन, महाप्रसाद व पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, तरी या कार्यक्रमासाठी जिल्हाभरामधून तसेच धाराशिव जिल्ह्यातून हजारो भाविक या चरण पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेणार आहेत तरी कळंब तालुक्यातील शहरातील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व भक्त गणांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे धाराशिव जिल्हा स्व-स्वरूप सांप्रदायाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आलेले आहे.