कळंब (प्रतिनिधी)- जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रकल्प प्रेरणा जिल्हा रुग्णालय धाराशिव यांच्या वतीने आज दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे मोफत तणावमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 789 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मनोविकार विभाग 42, NCD विभाग 257, दंत विभाग - 15, नेत्ररोग विभाग - 32,  ICTC विभाग - 80, अस्थिरोग विभाग - 12, क्षयरोग विभाग - 8, व्यसनमुक्ती - 21, आयुष विभाग -110, आणि जनरल ओपीडी - 212 अशा विविध रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. 

शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सुमित काकडे म्हणाले की, मनाचे आजार वेळीच ओळखून समुपदेशन आणि औषधोपचार केल्यास मानसिक आजार नियंत्रणात राहतात. आशा रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी गरज भासल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे संपर्क साधावा किंवा समुपदेशनासाठी टेलीमानस 14416 या मोफत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी  यावेळी केले. मानसिक आजार जर दूर ठेवायचे असल्यास योगासने, पुरेशी झोप, समतोल आणि नियमित आहार, व्यसनांचा नकार, सकारात्मक दृष्टिकोन अशा गोष्टीं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जोपासाव्यात असेही त्यांनी सांगितले. सदरील शिबिरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सय्यद सर  यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मंजुराणी शेळके, डॉ. महेश गुरव, डॉ. मनोज कवडे, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. शरद दशरथ, डॉ. मीरा दशरथ, डॉ. भक्ती गीते, डॉ. आरती कणसे, डॉ. आयशा खान आणि अधिसेविका श्रीमती मोहिनी कुलकर्णी ,समुपदेशक तानाजी      कदम ,दत्तप्रसाद हेड्डा आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धाराशिव टीम  यावेळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सुहास शिंदे यांनी केले व सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील शिंदे यांनी केले.  हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंब रुग्णालयातील इतर अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.


 
Top