तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजीटल लिटरसी या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या समारोप समारंभाप्रसंगी आप्पासाहेब पाटील, सदस्य महाविद्यालय विकास समिती, तुळजापूर यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लहान मुलांना आज्जी आजोबा किंवा इतर परिवारातील सदस्यांकडुन संस्कार प्राप्त व्हायचे आज ती परिस्थिती राहीली नाही,घरात आज्जी आजोबा नाहीत, कुटुंब विभक्त झाले आहेत, त्यामुळे ज्यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रम संस्कार शिबिर सुरू होतात त्यावेळी किमान आठवडाभर तरी एकत्रीत कुटुंबाची जाणिव मुलांना होत असते,शिक्षक जबाबदारीने त्यांना पालकांप्रमाणे सांभाळतात,लोकांकडे पैसा आला पण चंगळवाद वाढीस लागला,पण संस्कारक्षम शिक्षणपद्धती जोपासली जाणे आजही आवश्यक आहे ती शिबिरांच्या माध्यमातून जोपासली जाते,घाणेरडा वास दुरुनच यायला सुरु होतो,पण चांगला सुगंध घ्यायला त्या सुगंधाच्या जवळ जाणे आवश्यक असते,श्रम संस्कार शिबिरे हे फक्त स्वच्छता अभियान राबवित नाहीत तर विचारांना एक बैठक देण्याचे काम देखील करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यातील हा सुंदर संस्कारक्षम वर्ग कधीही चुकवुनये असे आह्वान शेवटी त्यांनी केले.अध्यक्षीय समापनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार म्हणाले की आयुष्यातील चांगली सुरुवात ही यशाची पहिली गुरुकिल्ली असते,यश हे संख्यात्मक नसते तर गुणात्मक असते, शिबिरामध्ये श्रमदानाबरोबरोच इतर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले, बालविवाह प्रतिबंधासाठी व्याख्यान आणि रॅली, आरोग्य शिबीर, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ग्रामस्थांच्या सहकार्याने मानवी साखळी आणि रॅली,गटशेतीचे महत्त्व, सेंद्रिय शेतीची महत्त्व, डिजीटल शिक्षण पध्दती काळाची गरज अंधश्रद्धा निर्मूलन अशा खुप साऱ्या विषयावर प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात आले,पण यात एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे या सामाजिक उपक्रमांमध्ये समाजानेही पुढाकार घेतला पाहिजे,कारण अशा गोष्टींमुळेच समाजाचा शाश्वत विकास होत असतो असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले,सदर प्रसंगी कु.आलूरकर संयोगी,बी कॉम भाग एक,कु राजकन्या वाळवे ,बी कॉम भाग एक,कु दिक्षा चौधरी,कु कृष्णा देविदास पाटील,कु.प्रतिक्षा सिध्दगणेश,कु रिया यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमासाठी प्रशांत रोकडे उप सरपंच, मौजे कामठा,कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा धनंजय लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु नन्नवरे हिने केले तर आभार कु कृष्णा पाटील हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ.मंत्री.आर आडे, डॉ आबासाहेब गायकवाड, कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा बाळासाहेब कुकडे यांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.