भूम (प्रतिनिधी)- भूम ते पंढरपूर माघ वारी पायी दिंडीने शुक्रवारी दि. 31 जानेवारी रोजी भूम येथून प्रस्थान केले. भगवंत भजनी मंडळाच्या वतीने माघ वारी पायी दिंडी गेल्या पंचवीस वर्षापासून काढली जाते. यावर्षी दिंडी सोहळ्याचे 26 वे वर्ष आहे.
भूम येथून दिंडीचे प्रस्थान होऊन देवांग्रा, धस पिंपळगाव, अलीपूर रोड बार्शी, पापनस, उपळाई, आष्टी, पंढरपूर असा पायी प्रवास प्रवास करून 8 फेब्रुवारी रोजी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे दिंडी पोहोचते.एकादशी दिवशी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्याकडून वारकरी बांधवांना पंढरपूर येथे उपासाचा फराळाचे आयोजन करण्यात येते. भूम येथे पायी दिंडी सोहळा जात असताना माजी नगराध्यक्षा संयोगिताताई संजय गाढवे यांनी दिंडीचे दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी शहाजी साबळे, राजाभाऊ बाराते, दत्ता साठे, अतुल डिसले, राम बाबर, कुमार भांगे, गोवर्धन माळी, अनिल शेळके, गोपीनाथ गाढवे, रामदास कागदे, रणजीत भोळे, आदी उपस्थित होते.