तुळजापूर (प्रतिनिधी)- आजच्या माहिती  तंत्रज्ञानाच्या व कृत्रीम बुध्दीमत्तेच्या युगात मराठी भाषा संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे.या मराठी भाषा संर्वधन चळवळीत प्रत्येकांनी सहभागी होवून मराठी भाषा अधिक समृध्द करावी असे प्रतिपादन रेणापूर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.जयद्रथ जाधव यांनी व्यक्त  केले.

तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयात कनिष्ठ व वरीष्ठ मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संर्वधन पंधरवड्यानिमित्त ' मराठी भाषा संर्वधनः काळाची गरज'या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो.डॉ.जीवन पवार होते.यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.बापूराव पवार,स्टाफ सेक्रेटरी डॉ.नेताजी काळे,मराठी विभागातील डॉ.अनंता कस्तुरे,प्रा.वनिता बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य प्रो.डॉ.जीवन पवार म्हणाले  मराठी भाषेच्या समृध्दीसाठी व संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने योगदान देण्याची गरज आहे. आजच्या कृत्रीम बुध्दीमत्तेच्या डिजिटल युगात मराठीच्या वापरावर विशेष भर दिला पाहिजे. प्रत्येक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत कविता,कथा ,लेख आदी स्वरूपाचे लेखन  केले तरच खऱ्या अर्थाने   मराठी भाषेचे स्थान बळकट होईल.

प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.बापूराव पवार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.वनिता बाबर यांनी केले.आभार डॉ.अनंता कस्तुरे यांनी मानले.प्रारंभी  हुतात्मा दिनानिमित्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी  उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ.जयद्रथ जाधव यांना  मराठी भाषेचे संर्वधन,मराठीवरील इतर भाषांचा प्रभाव, मराठी संर्वधनासाठी उपाय याबाबत प्रश्न विचारून संवाद साधला.कार्यक्रमास  सर्व गुरूदेव कार्यकर्ते ,साहित्यप्रेमी, विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

 
Top