तुळजापूर (प्रतिनिधी)- सोयाबीन भावा बाबतीत शेतकऱ्यांची किती अहवेलना करता असा सवाल करुन, पोकळ घोषणा करून नका आमचे लक्ष आहे. शेतकरी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी अखेरच्या क्षणापर्यत संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंञी माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी पञकार परिषद घेऊन केले.
नववर्ष पार्श्वभूमीवर पञकारांशी संवाद साधताना म्हणाले कि, सोयाबीन हमीभाव खरेदी अखेरची डेड लाईन 15 जानेवारी 2025 आहे. आज पर्यंत सर्व्हर डाउन, बारदाना कमतरता यामुळे हमीभावाने सोयाबीन खरेदी जिल्हयात अवघी पंचवीस टक्के झाली आहे. असे सांगून मधुकर चव्हाण यांनी तालुक्यात 79 जलजीवन पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. या पुर्ण करण्याची डेडलाईन 20 डिसेबंर 2024 होती ती संपली. तरीही जुने 67 जलजीवन कामे अपुर्ण आहेत. यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाचे आहेत. दिवसा वीज शेतीला देणे, जानेवारी 2025 मध्ये कृष्णा खोरेचे पाणी रामदरा तलावात पाणी खळखळणार यासह अनेक शासनाने केलेल्या घोषणा या पोकळ ठरत आहेत. त्याचे पुढे काय याचे कुणाकडे उत्तर नाही. बोरी धरणातील पाणी रबी पिकासाठी सोडा अशी मागणी यावेळी केली. सध्या देविभक्तांना साध्या मुलभुत सुविधा मिळतात का ?असा सवाल करुन त्या प्रथम द्या. हुतात्मा स्मारक, आर्य चौक, पावणारा गणपती, किसान चौक पर्यत रस्ता कधी होणार? चव्हाण यांनी जनतेच्या बाजूने लढणार असे यावेळी सांगितले. यावेळी अमर मगर उपस्थितीत होते. मधूकर चव्हाण यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोबाईलवरून फोन करत तुळजापूर- लातूर महामार्गावरील सर्व्हीस रोड, रस्त्यालगत असलेल्या सांडपाण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी नळदुर्ग, सोलापूर- हैद्राबाद या रस्त्याबाबतही गडकरी यांना सांगितले.