नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील मैलारपूर येथे भरणाऱ्या श्री खंडोबा यात्रेत राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेत पहिली मानाची कुस्ती ही डबल महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान शिवराज राक्षे यांची होणार आहे. अशी माहीती श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकूर यांनी सांगितली. दरम्यान या कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे यांची कुस्ती म्हणजे आकर्षण राहणार आहे. जवळपास शंभर कुस्तीगीर या स्पर्धेत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पहिल्या मानाच्या कुस्तीसाठी दोन लाख 51 हजार रुपयेचे पारितोषिक असणार आहे. तर पूदाले परिवाराच्या वतीने मानाचा चांदीचा गदा देण्यात येणार आहे.

नळदुर्ग मैलारपूर येथे दि. 12 ते 14 जानेवारी 2025 या कालावधी मध्ये श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिसस हा पौष पौर्णिमा म्हणजे 13 जानेवारी रोजी आहे. तर दि. 14 जानेवारी रोजी श्री खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समीतीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय  कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्ती आखाडा समीतीचे अध्यक्ष रणजितसिंह ठाकूर, सेवानिवृत्त्‌‍ परिवहन अधिकारी नंदकुमार डुकरे, कार्याध्यक्ष बंडू पूदाले, उपाध्यक्ष अनिल पूदाले, कोषाध्यक्ष संजय मोरे पाटील, शिवाजीराव वऱ्हाडे सुधाकर चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी एकत्र येवून सन 2017 साली कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा बांधला. दरम्यान सन 2017 पासून कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी सोडला तर सतत या ठिकाणी श्री खंडोबा यात्रेत कुस्ती आखाडा समीतीच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी ही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या मानाच्या कुस्तीसाठी समीतीकडून दोन लाख 51 हजार रुपयेचे पारितोषीक ठेवण्यात आले आहे. तर पूदाले परिवाराच्या वतीने मानाचा चांदीचा गदा ही देण्यात येणार आहे. या वर्षीची पहिली मानाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान शिवराज राक्षे हे खेळणार आहेत. त्यांच्यासाठी प्रतिस्पर्धी कोण मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 
Top