तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे भातंब्री येथील जमीन सर्वे नं. 22 व 26 मध्ये भुमि अभिलेख तुळजापुर यांनी व जिल्हाअधिक्षक धाराशिव यांनी एकत्री करणाच्या नावाखाली कोर्ट कमिश्नर संभाजीनगर यांना चुकीची माहिती देऊन जमीनचे क्षेत्र वाढीव करुण दिल्यामुळे रस्त्यावरती अतिक्रमण झाले आहे. यामुळे आम्हा शेतकऱ्यावरती गेले चार ते पाच वर्ष झाले नाहाक त्रास होत आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणा मध्ये दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वरती दंडात्मक कार्यवाहीचे आदेश काढून व झालेले नुकसान दोषीकडुन वसुल करुन देण्यात यावे. सर्वे नं. 22 व 26 मुळ रेकॉर्ड प्रमाणे हद्दीखुणा कायम करुन देत नसल्या कारणामुळे दि. 08 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयाच्या आवारात न्याय मिळण्याकरीता आत्मदहण करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांनी दिले आहे.
तरी या प्रकरणामध्ये भूमि अभिलेख कार्यालय, तुळजापुर व जिल्हा अधिक्षक धाराशिव यांच्या गचाळ कारभारास कंटाळुन आत्दहन करीत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा अधिक्षक धाराशिव व उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालय तुळजापुर हे जबाबदार राहतील. ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे व करीत आहेत त्यांना कायमस्वरुपी घरी पाठवावे व आमचे झालेले नुकसान व होणारे नुकसान त्यांच्या पगारातुन देण्यात यावी. या यापुढील सर्व जबाबदारी संबंधीत अधिकारी यांच्यावर राहील. तरी याची गांभिर्याने दखल घेवुन दोषींवर कठोर कार्यवाहीचे आदेश पारीत करावी.