धाराशिव (प्रतिनिधी)- स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महात्मा फुले चौक, धाराशिव येथे सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हाउपाध्यक्ष पदी आण्णा वर्षेकेतू भोगील यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे  यांच्या  हस्ते  आणि भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी आण्णा वर्षेकेतू भोगील यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अण्णा भोगील यांनी   माजी सभापती पंचायत समिती भूम,   माजी सदस्य जिल्हा परिषद धाराशिव, माजी सदस्य पशुसंवर्धन समिती  जिल्हा परिषद धाराशिव या पदावर त्यांनी काम केले असून त्यांना राजकीय अनुभव आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, धाराशिव उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,  धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, राष्ट्रवादीचे नेते अमित शिंदे,परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, लोहारा शहराध्यक्ष तथा मा.उप नगराध्यक्ष आयुब शेख, जिल्हा उपाध्यक्ष अण्णा भोगील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, तुळजापूर तालुका उपाध्यक्ष सुधीर मगर, धाराशिव शहर कार्याध्यक्ष अकबर पठाण, परंडा तालुका सदस्य धर्मराज गटकुळ  अतिष हरभरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top