भूम (प्रतिनिधी)-  बौद्ध स्मशानभूमीचा विकास करा अन्यथा गळ्यात मडके पाठीला झाडू बांधून 25 जानेवारी रोजी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

भूम शहरात रवींद्र हायस्कूलच्या बाजूला बौद्ध समाजासाठी एकमेव स्मशानभूमि आहे.त्यासाठी शहरातील चंद्रमणी गायकवाड व विकी जावळे यांनी सरणावर बसून स्म्शान भूमित आमरण उपोषण केले होते. त्यानंतर तात्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी बौद्ध स्म्शानभूमीसाठी 0.41 आर जमीन नगर परिषदेला बौद्ध स्मशानभूमीसाठी दिली. गेल्या वर्षात फक्त त्याठिकाणी दहन शेड उभारण्यात आले. पण इतर सुविधा देण्यात आल्या नाहीत. वेळोवेळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदने देऊनही त्यांनी यावर कांही दखल घेतली नाही.स्मशानभूमीत कंपाऊंड, पाण्याचा हौद,दहन शेड जाळी,निवारा शेड, व लाईट यासाठी येणाऱ्या 24 /1/25 पर्यंत नगर परिषदेने विकास कामे केली नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी दि 25/1/25 रोजी भूम नगर परिषदेसमोर गळ्यात मडके व पाठीला झाडू बांधून प्रशासकाचा निषेध करुन आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन चंद्रमणी गायकवाड व विकी जावळे यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.


 
Top