धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. धाराशिव शाखा भुम यांच्या वतीने आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.हा   कार्यक्रममोठ्या उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम भुम येथील चौंडेश्वरी मंगल भवन ,कोष्टी गल्ली,भुम येथे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी तिळगुळ वाण, भेटवस्तू व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आलेहोते, तसेच संस्थेच्या विविध ठेव योजना व महिला सक्षमिकरणासाठी बचत गट कर्ज योजनेबद्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास भुम शहर व परिसरातील 400 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी परिसरातील आशा कार्यकर्त्या,बचत गट महिला यांचीप्रमुख उपस्थिती होती.

रुपामाता अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. धाराशिव शाखा तुळजापूर यांच्या वतीने आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम तुळजापूर येथील जवाहर गल्ली शाखा येथे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी तिळगुळ वाण, भेटवस्तू व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, तसेच संस्थेच्या विविध ठेव योजना व महिला सक्षमिकरणासाठी बचत गट कर्ज योजनेबद्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास तुळजापूर शहर व परिसरातील 500 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळी परिसरातील आशा कार्यकर्त्या , बचत गट महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.

रुपामाता अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. धाराशिव शाखा शिराढोण यांच्या वतीने आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम शिराढोण येथील श्री दत्त मंदिर येथे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी तिळगुळ वाण, भेटवस्तू व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, तसेच संस्थेच्या विविध ठेव योजना व महिला सक्षमिकरणासाठी बचत गट कर्ज योजनेबद्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमास शिराढोण गाव व परिसरातील 300 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यावेळीसरपंच सौ. लक्ष्मीबाई म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्या तसेच परिसरातील आशा कार्यकर्त्या, बचत गट महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top