तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पालकमंञी झाल्यानंतर प्रथमच धाराशिव जिल्हा दौरावर आले असता प्रथम शनिवार दि. 25 जानेवारी रोजी  श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.

धारशिव येथुन पालकमंञी प्रताप सरनाईक यांचे तिर्थक्षेञ तुळजापूर हद्दीत प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी शेकडो बालवारक-याच्या टाळमृंदग गजरात जेसीबीतुन फुले उधळुन पालकमंञ्याचे स्वागत केले. नंतर श्रीतुळजाभवानी मंदीर जवळ येताच शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख बापुसाहेब भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर थेट मंदीरात जावुन श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी करुन ओटी भरुन कुलधर्म कुलाचार  केला. यावेळी पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी प्रशांत दिलीपराव गंगणे यांनी केले. श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिर संस्थानमध्ये चालू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. नंतर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तर्फ जिल्हाधिकारी तथा मंदीर समिति अध्यक्ष डाँ. सचिन ओम्बासे यांनी सरनाईक यांची देविची प्रतिमा, महावस्ञ, श्रीफळ देवुन स्वागत केले.

यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक सचिन जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, संपर्क प्रमुख नितीन लांडगे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, संताजी चालुक्य, माजी खासदार रवि गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरज सांळुके, बापुसाहेब भोसले, शांताराम पेंदे,भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, संदीप गंगणे सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 
Top