परंडा ( प्रतिनिधी )- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक दिपक गणपत तोडकरी यांना दि.26 डिसेंबर 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी बहाल केली.
तोडकरी यांनी अ स्टडी ऑफ सेंटर अँड मार्जिन विथ स्पेशल रेफरन्स टू द सिलेक्टेड वर्क्स ऑफ डोरिस लेसिन या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला होता.विद्यापीठाने दि.26 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने तोंडी परीक्षा आयोजित केली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे ऑनलाइन पद्धतीने तोंडी परीक्षा घेण्यात आली. त्यांचे मार्गदर्शक डॉ.जी.डी. कोकणे यांनी मार्गदर्शन केले होते.त्यांना मिळालेल्या शिक्षणातील उच्च पदवीसाठी संस्थेचे सचिव संजय निंबाळकर,अध्यक्ष सुनील शिंदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेश कुमार माने , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे , परीक्षा प्रमुख डॉ अतुल हुंबे ,इंग्रजी विभाग प्रमुख डॉ प्रशांत गायकवाड , रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले होते. यावेळी सूत्रसंचालन डॉ प्रशांत गायकवाड यांनी केले तर डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले.