धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्राचीन दर्गा सुफी संत महंमद ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या मानवतेच्या संदेशाच्या स्मृतींना उेाळा देण्यासाठी धाराशिव शहरात दरवर्षी ऊरूस भरवला जातो. या उरूसानिमित्त गुरूवारी शहरातील बाजारपेठेतील अरब मस्जिद पासून संदलला सांयकाळी वाजत-गाजत मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. 

ही संदल मिरवणूक काळा मारूती मंदिर ते माऊली चौक, विजय चौक, शम्स चौक या वर्षीचा 720 व्या उरूसानिमित्त संदलचा मान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना दिला गेला. यानंतर सज्जादाचा मदिना चौकमार्गे दर्गाहकडे पोहचली. परंपरेनुसार संदलाचा प्रथम मान जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर यानंतर सर्वजण नतमस्तक झाले. अरब मस्जिद मध्येच सज्जादाचा मान मुजावर कुटुंबियांना दिला गेला. तर यावेळी संदल मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही संदल मिरवणूक सुरू होती. या उरूसानिमित्त धाराशिव शहरासह जवळील ग्रामीण भागातून भक्त दर्शनासाटठी येतात. हिंदू-मुस्लिम सर्व धर्मियांचे श्रध्दा स्थान असलेल्या ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांचा उरूस दि. 13 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यत असला तरी महत्वपूर्ण दिवस 4 आहेत. यात गुरूवारी संदल तर शुक्रवारी चिराग व त्यानंतर शायरीचे कार्यक्रम असणार आहेत. गुरूवारी रात्री प्रमुख बाजारपेठेतून नेहरू चौकातून थेट दर्गाहपर्यंत संदल मिरवणूक चालली यावेळी सर्व जाती धर्माचे लोक यात एकोप्याने सामील झाले हेते. दक्षिण भारतातील सर्वात मो दर्गा म्हणून उस्मनाबाद येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी दर्गा ओळखला जातो. 

 
Top