भूम (प्रतिनिधी)- नेहरू युवा केंद्र धाराशिव व जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्था भूम च्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव येथील महाविद्यालयातील प्रांगणात तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये विविध गावातील परिसरातील युवकानीं , युवतीनी सहभागी होऊन यश संपादन केले.
या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळ घेण्यात आले यात खो- खो, कब्बडी , गोळा फेक , 100 मीटर धावणे स्पर्धेतील विजेत्या संघाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व श्रीफळ फोडून अभिवादन करुन करण्यात आले. यावेळी अंतरगाव महाविद्यालय प्राचार्य रामचंद्र वाघमारे, अजिनाथ पालके, सुधाकर जाधव, मच्छिंद्र वनवे,सचिन पाटील, बालाजी काळे, स्वप्नील शिंदे, बालाजी तोडकर, सुधीर इंगळे, बाजीराव शेळके, ज्ञानोबा अनंत्रे, राजकुमार धानोरकर, संतोष खैरे सुशांत कसबे आदि उपस्थित होते. तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्था कार्यवाहक प्रदीप साठे यांनी केले. तर आभार सचिन पाटील यांनी मानले.