धाराशिव (प्रतिनिधी)- महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा प्रसार व प्रचार ग्रामीण भागात पोहोचविण्याच्या उद्देशाने मौजे गडदेवदरी घाटंग्री तालुका जिल्हा धाराशिव तगरभूमी बुद्ध फिलॉसॉफी रिसर्च ट्रेनिंग अँड सोसायटी धाराशिव यांचे विद्यमाने दिनांक 19 जानेवारी 2025 वार रविवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुजनीय भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो हे भूषविणार आहेत. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव यशवंतराव आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत तसेच पुजनीय भंते सुमेधजी नागसेन सर्वेसर्वा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कार्यक्रम स्थळी बुद्धगया येथील बोधि वृक्षाचे रोपण तसेच 28 फूट उंचीचा अशोक खांबाचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुणे भीमराव आंबेडकर यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आयुष्यमान कैलास शिंदे व संयोजक म्हणुन पी.एम.सोनटक्के (बापूजी) तसेच निमंत्रक म्हणून आयुष्यमान चेतन शिंदे साहेब (संपादक दि पीपल पोस्ट) हे काम पाहत आहे. तसेच या कार्यक्रमास भिमशाहीर साहेबराव येरेकर यांचा बुद्ध व भीम गीताचा कार्यक्रम सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी तसेच बौद्ध बौद्धाचार्य व समता सैनिक दल यांची उपस्थिती राहणार आहे .तरी जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिका यांना तगरभूमी बुद्ध फिलॉसॉफी सर्च ट्रेनिंग अँड सोसायटी धाराशिव यांच्या वतीने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणे बाबत आवाहन भंते सुमेधजी नागसेन यांनी आहे.

 
Top