धाराशिव (प्रतिनिधी)- ‌‘आजचे विद्यार्थी उद्याचे नागरीक' हा दृष्टीक्षेप लक्षात घेउन पोलीस अधीक्षक श्रसंजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक- सारफळे यांनी दि.03.01.2025 रोजी जिल्हा परिषद शाळा सांजा ता. जि. धाराशिव येथे भेट देवून विद्यार्थ्यांकरीता केंद्र शासनाने सन- 2018 पासून ‌‘स्टुडंट पोलीस कॅडेट योजना' सुरु केली आहे. 

या योजनेतून विद्यार्थी व पोलीस यांच्या बंध निर्माण होउन कायदा व सुवव्यवस्थाव, सार्वजनिक शांतता राखण्यास आवश्यक असा सदृढ समाज निर्मीती शक्य होणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ‌‘स्टुडंट पोलीस कॅडेट' योजना अंतर्गत विद्यार्थी वर्गाशी संवाद साधून सायबर क्राईम(गुन्हे), बालकामगार, बालगुन्हेगारी, विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर व शाळेच्या परिसरातील छेडछाडीस आळा घालण्यासाठी पोलीस काका व पोलीस दिदी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करुन लैंगीक छळा संबंधीच्या भारतीय दंड संहिता व पोक्सो अधिनियमातील तरतुदींसोबतच गुड टच-बॅड टच, डायल 112 मदत वाहिनी, वाहतुक नियम इत्यांदीसह समाज माध्यमांतील गुन्ह्यांसंदर्भात मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थितीत होते.

 
Top