तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरात नात्याला काळींमा फासणारी घटना पुन्हा घडली असून, नराधम सावत्र बापाने वाईट दृष्टिकोनातून बारा वर्षे पीडित मुलीवर रात्री सर्व झोपले असताना जवळ जाऊन वाईट दृष्टिकोनातून पीडित अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बापाविरुद्ध दिनांक 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर शहरातील बारा वर्षीय मुलगी ही दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण जेवण करुन पती व लहान मुलगी असे खाली जमीनीवर अंथरुन झोपलो होतो.  मोठी मुलगी ही जवळच असलेल्या सिंगल दिवाणवर झोपलेली असताना दिनांक 18 जानेवारी रोजी अंदाजे 00.30 वाजणेच्या सुमारास मोठी मुलगी ही अचानक ओरडल्याने पीडित मुलीची आई जागी झाली. तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी मांडीवर हात टाकला होता व मांडी दाबली. तेव्हा पीडित मुलीच्या आईने पाहिले. म्हणुन पतीला तुम्ही असे का करायला लागलात असे म्हणताच  यांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की करुन ढकलुन दिले. आम्हाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन तुम्ही कोणाला काही सांगीतले तर तुम्हाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. तसेच तुमचे ब्लेडने गळा चिरुन जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. 

अशा प्रकारची फिर्याद बारा वर्षीय पीडित मुलीच्या आईने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बाप याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74,115(2)352,351(1), बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिणी जाधव हे करत आहेत. तर नाराधम बाप गुन्हा दाखल होताच फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 
Top